1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (13:37 IST)

अर्थसंकल्पीय अधिवेशन अपडेट

नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे 256 वे अधिवेशन 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. याआधी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना आगामी निर्देश दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष या दोघांनी सेक्रेटरी जनरल यांना प्रचलितपरिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील  कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. 
 
गेल्याअनेक वर्षांपासून अर्धसंकल्पीय अधिवेशन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत आहे. यामध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण होते आणि 1फ्रेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. साधारणत: अर्धसंकल्पीय अधिवेशन मे महिन्यापर्यंत दोन टप्प्यात चालते. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प यावर चर्चा केली जाते आणि त्यानंतर सर्व पक्षांच्या मदतीने ते पारित केले जाते.