अॅम्बेसी अॉफीस पार्कची क्ले स्कूल्स बरोबर भागीदारी
डे-केयर आणि प्री स्कूल सोल्युशन अाता अॅम्बेसी टेक झोन पुण्यामध्ये पुणे – अॅम्बेसी अॉफीस पार्क ने नुकतेच क्ले स्कूल्स बरोबर भागीदारी प्रस्तावावर हस्ताक्षर केले आहे. जी भारतातील सगळ्यात मोठा प्री स्कूल आणि डे केयर चैन आहे.
क्ले स्कूल अॅम्बेसी टेक झोन पुण्यात १ ते १० वर्षापर्यंतच्या जवळपास ४० मुलांना डे-केयर आणि प्री स्कूलची सुविधा प्रदान करेल. ह्याचबरोबर सीसीटीव्हीची सुविधा देखील असेल ज्यात पालक आपल्या लहान मुलांच्या देखरेखीबाबत निर्धास्त होतील. शिशु, किशोर आणि त्यांच्यापेक्षा मोठ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्षांची सुविधा देखील येथे आहे.याचबरोबर वर्ष समाप्तीपर्यंत अॅम्बेसी टेक विलेज आणि अॅम्बेसी मान्यता बंगलोर मध्ये स्थापित होईल.
क्ले सेंटरच्या प्रत्येक अॅम्बेसी अॉफिस पार्कचे क्षेत्रफळ ३००० से ८००० वर्गफिट असेल आणि येथे सर्व काही सर्वोत्कृष्ट लाइव्ह एचडी सुविधायुक्त असेल. वयोमानानुसार कक्ष वितरण, आउटडोर क्रिडा क्षेत्र, स्वयंपाकघर आणि मुलांना शिकवण्याची खास पद्धत्ती येथे असेल.