शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (22:15 IST)

मध्य रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून तब्बल 443.35 कोटीचे मिळविले उत्पन्न

मुंबईच्या मध्य रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून तब्बल 443.35 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मध्य रेल्वेने 'झिरो स्क्रॅप मिशन'चा एक भाग म्हणून सर्व पाच विभाग आणि विविध डेपोंमध्ये भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे. 
 
मध्य रेल्वेने 2021-22 या आर्थिक वर्षात फेब्रुवारी 2022 पर्यंत भंगारातून 443.35 कोटी उत्पन्नाची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्नापेक्षा हे 106.57 कोटी अधिक आहे जे 31.65 टक्क्यांने वाढले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्न 336.78 कोटी होते.
 
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, भंगाराच्या विक्रीमुळे केवळ महसूल मिळत नाही तर परिसराची चांगली देखभालही होत आहे. रेल्वेमधील विविध ठिकाणी शोधण्यात आलेल्या सर्व भंगार साहित्याची मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये विक्री करेल. मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने 'झिरो स्क्रॅप मिशन' सुरू केले. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, वापर करण्यास अयोग्य डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे.