Festival Posters
✕

येथे रेशन कार्डवर स्वस्त पेट्रोल

Updated: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (10:03 IST)
 
स्वस्त पेट्रोल मिळेल
देशातील अनेक राज्यांमध्ये रेशनकार्डवर विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आज झारखंड सरकारने राज्यातील सुमारे 20 लाख लोकांना रेशन कार्डवर स्वस्त पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ही विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे.
 
20 लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे
झारखंड राज्यात सरकारने पेट्रोल सबसिडी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त पेट्रोल सबसिडी योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 20 लाख लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
 
कोणत्या लोकांना मिळणार फायदा?
लाल, पिवळे आणि हिरवे शिधापत्रिकाधारकांना पेट्रोल सबसिडी योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे झारखंड राज्य नोंदणीचे दुचाकी वाहन आहे ते त्याचा लाभ घेऊ शकतात. दर महिन्याला या योजनेच्या लाभाचे 250 रुपये थेट बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
 
खात्यात 250 रुपये येतील
पेट्रोल सबसिडी योजनेंतर्गत प्रत्येक सदस्याला महिन्याला 10 लिटर पेट्रोलवर 25 रुपये सबसिडी दिली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याला 250 रुपये थेट तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, पेट्रोल खरेदी करताना तुम्हाला पंपावर पूर्ण रक्कम भरावी लागेल आणि महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात 250 रुपये ट्रान्सफर केले जातील.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नाशिक सिंहस्थ कुंभाप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले "३५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने सुविधांमध्ये परिवर्तन घडवले जाईल"

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० जमा होण्यास सुरुवात झाली

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकॅडमी अमरावतीमध्ये सुरू होणार

नागपूरमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला

घरबसल्या ट्रेनने पार्सल पाठवा! रेल्वेची घरपोच वितरण सेवा मुंबई आणि पुण्यासह ८ शहरांमध्ये सुरू होणार

पुढील लेख
Show comments