रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आता रेल्वेतही पाहू शकता मालिका आणि चित्रपट

रेल्वेचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना कायमच नवनवीन सुविधा दिल्या जातात. यामध्ये आणखी एक भर पडली असून रेल्वे प्रवाशांना आता प्रवासादरम्यान आपल्या आवडीच्या मालिका आणि चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे दिघेकाळाचा रेल्वे प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
प्रवाशांना दूरच्या पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास अनेकदा 10 ते 25 तास इतका काळ रेल्वेमध्ये रहावे लागते. अशावेळी हा प्रवास कंटाळवाणा होऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून रेल्वेही अनोखी शक्कल लढविली आहे. प्रवासादरम्यान मनोरंजन हवे असल्यास रेल्वे प्रशासनाकडून मालिका आणि चित्रपट दा‍खविण्याची नवीन सुविधा सुरू करणार आहे. ही सुविधा लॅपटॉप, मोबाइल आणि इतर साधनांवर दिली जाणार असून त्यासाठी प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
 
याबाबत माहिती देताना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की रेल्वेमध्ये लोकप्रिय झालेल्या मालिका, चित्रपट आणि बॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच स्थानिक चित्रपट देण्याचाही प्रयत्न करणार आहे. याशिवाय काही गाजलेल्या परदेशी मालिका आणि कॉमेडी शोचे भागही उपलब्ध करून दिले जातील. या उपक्रमामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल असेही ते म्हणाले.
 
सुरूवातीला ही सुविधा राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि हमसफर या रेल्वेमध्ये दिली जाणार आहे. कालांतराने इतर रेल्वे आणि स्थानकांवरही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. हा नवा प्रकल्प एका रेल्वेमध्ये सुरू करण्यासाठी साधारण 25 लाख रूपये इतका खर्च येणार असल्याचेही या अधिकार्‍यांनी सांगितले. याशिवाय रेल्वेमध्ये रेडिओ सेवाही दिली जाणार असून ती पूर्णपणे मोफत असल्याचे रेल्वे प्रशासनकाडून सांगण्यात आले.