1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2024 (22:27 IST)

दीपिका पदुकोणचा ब्रँड '82°E' ची रिलायन्स रिटेलच्या 'टीरा' सोबत भागीदारी

ग्लोबल इंडियन आयकॉन दीपिका पदुकोणच्या सेल्फ-केअर ब्रँड 82°E ने आज रिलायन्स रिटेलच्या ब्युटी प्लॅटफॉर्म टीरा(TIRA )सह भागीदारीची घोषणा केली. दीपिकाचा ब्रँड आता टीरा च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
 
82°E ने स्किनकेअर आणि बॉडी केअर प्रोडक्ट्ससोबत पुरुषांसाठी खास रेंज आणली आहे. ज्यामध्ये अश्वगंधा बाउन्स, लोटस स्प्लॅश आणि हळद शील्ड सारखी सर्वाधिक विक्री होणारी उत्पादने TIRA वर उपलब्ध असतील. हे Tira ॲप आणि वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतात. सुरुवातीला, 82°E उत्पादने मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि पुणे येथील टिरा ऑफलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध असतील. जी नंतर इतर शहरांमध्येही उपलब्ध करून दिली जाईल.
 
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक ईशा एम अंबानी म्हणाल्या, “आम्ही 82°E या सेल्फ-केअरच्या प्रसिद्ध ब्रँडसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. ही भागीदारी टीरा च्या दृष्टीला पुढे आणते आणि आम्हाला आमच्या ग्राहकांना प्रीमियम स्किन केअर उत्पादने वितरित करण्यात मदत करते. एकत्रितपणे, प्रथमच ऑफलाइन रिटेलमध्ये 82°E उत्पादने सादर करण्याचे आमचे ध्येय आहे.”
 
फिल्मस्टार आणि 82°E च्या सह-संस्थापक, दीपिका पदुकोण म्हणाल्या, “आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की 82°E आता ऑनलाइन आणि टीरा येथील स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. स्किनकेअर सोपी करणे आणि स्वत:ची काळजी घेणे हा आमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही टीरा च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर 82°E ची 82°E स्किनकेअर, 82°E बॉडी केअर आणि 82°E मॅन सारखी सर्वाधिक विक्री होणारी उत्पादने आणत आहोत.
 
ग्राहक 82°E उत्पादने टीराॲप, वेबसाइट आणि निवडक टीरा स्टोअरद्वारे खरेदी करू शकतात. उत्पादने उपलब्ध असलेली दुकाने -
● जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, मुंबई
● विवियाना मॉल, ठाणे, मुंबई
● कोपा, पुणे
● मॉल ऑफ एशिया, बेंगळुरू
● DLF साकेत, नवी दिल्ली