मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (13:33 IST)

कॅशलेस व्यवहार करा, जिंका रोख पारितोषिके

digital payment
केंद्र सरकारकडून ईकॉमर्स च्या मदतीने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी  नव्या योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. डिसेबर २५ पासून म्हणजेच नाताळच्या शुभमुहूर्तावर सुरवात होऊन १४ एप्रिल पर्यंत लागू असेल. यामध्ये ग्राहकांना एक कोटी पर्यंत जिंकण्याची संधी आहे.
 
यासंदर्भात निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरवर घोषित केले. त्याचप्रमाणे या योजनेसाठी ३४० कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतील १५ हजारे ग्राहकांना दररोज प्रत्येकी एक हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हि योजना मुख्यत्वे जे ग्राहक कॅशलेस म्हणजेच ऑनलाइन पेमेंट करतील त्यांच्यासाठीच आहे. योजनेच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच १४ एप्रिल रोजी एक कोटी रुपयांचे अंतिम पारितोषिक जाहीर करण्यात येईल. द्वितीय क्रमांकाला ५० लाख, तर तृतीय विजेत्याला २५ लाख रुपये मिळतील.व्यापारी वर्गासाठी डिजीटल धन व्यापारी योजनेअंतर्गत भाग्यविजेत्या व्यापाऱ्यांना आठवड्याला ५० हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. इतर ग्राहकांना देखील दर आठवड्याला सात हजार बक्षीसं जाहीर केली जातील.