31 मार्चआधी करून घ्या ही आवश्यक कामं
आर्थिक वर्ष 2023-24 संपायला काहीच दिवस उरलेले आहे. नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. हे आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांना पैशाशी संबंधित अनेक कामे पूर्ण करावी लागतात. हे न केल्याने त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर बोजा येतो. 31 मार्च पूर्वी ही कामे करून घ्या
TDS दाखल करणे
करदात्यांना जानेवारी 2024 साठी वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीसाठी मार्च मध्ये ३१ तारखेच्या आधी TDS दाखल करण्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार. कलम 194-IA, 194-IB आणि 194M अंतर्गत कर कपात केली गेली असल्यास चालानाचे
विवरण 30 मार्चच्या पूर्वी दाखल करावे लागणार.
आयटीआर फाइलिंगदाखल करणे
आयटीआर फायलिंग करदात्यांसाठी महत्त्वाचे आहे. तुमचे अद्यावत आयकर रिटर्न ३१ मार्च पर्यंत भरता येणार आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्षात त्यांचे विवरण पत्र भरले नाही किंवा ते उत्पन्नाचा काही भाग दाखवू शकले नाही.किंवा आयकर रिटर्न मध्ये चुकीचे तपशील भरले आहे अशा परिस्थितीत आयकर पोर्टल वर जाऊन अपडेटेड रिटर्न दाखल करू शकतात.
कर वाचवण्यासाठी गुंतवणूक
आयकर रिटर्न भरण्याचा कालावधीही एप्रिलपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही आर्थिक वर्ष 2023-24 साठी जुन्या कर प्रणालीमध्ये कर भरत असल्यास गुंतवणुकीचा कर सवलतीचा दावा करू शकतात. बचत साधनांमध्ये गुंतवणूक केली नसल्यास PPF, ELSS. सुकन्या समृद्धी, मुदत ठेव, NPS आणि पोस्ट ऑफिसच्या इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.
FASTag KYC अपडेट
फास्टॅग वापरकर्त्यांसाठी 31 मार्चची तारीखही महत्त्वाची आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगचे केवायसी तपशील अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली असून या पूर्वी अंतिम तारीख 29 फेब्रुवारी होती. आता बदलण्यात आली असून ता 31 मार्च करण्यात आली . नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनच्या वेबसाइटवर किंवा इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट देऊन तुमच्या फास्टॅगचे केवायसी तपशील अपडेट करू शकता.असे या केल्यास फास्टॅग खाते 1 एप्रिल पासून अवैध होतील.
किमान गुंतवणूक
पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी सह इतर सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यात किमान गुंतवणूक करावी लागणार. पीपीएफ मध्ये किमान 500 रुपये आणि सुकन्या योजनेत किमान 250 रुपये गुंतवणूक करावी लागणार. असं न केल्यास खाते डिफॉल्ट घोषित होऊ शकते. आणि दण्ड भरावा लागेल.
Edited by - Priya Dixit