नागपुरात ई टॅक्सी सेवा, इंधनाची बचत
राज्याची उपराजधानी नागपुरात ई टॅक्सीची सुरूवात होतेय. संपूर्ण देशातला हा पहिलाच प्रकल्प आहे.
कोणत्याही पेट्रोलियम पदार्थाचा इंधन म्हणून वापर न करता ही टॅक्सी विजेटवर चालणार आहे.
त्यामुळे प्रदूषणमुक्त वाहनांकडे ही मोठी वाटचाल असणार आहे. ही कार विजेच्या माध्यमातून चार्ज होते.
एकदा चार्ज झाली की ही गाडी साधारणत: 140 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करू शकते. ताशी 80 किमी वेगाने ही गाडी धावते. गाडी चार्ज करण्याचा खर्च पेट्रोल डिझेलपेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे ही गाडी प्रवासासाठी अतिशय स्वस्त आहे.
तसंच पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून होणारं कार्बन डाय ऑॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूंचं उत्सर्जन यातून होत नाही त्यामुळे ही गाडी पर्यावरणालाही उपयुक्त आहे.
या सेवेला सुरूवात केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणार आहे.