1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2016 (17:23 IST)

कर्मचारी भविष्य निधीच्या व्याज दरात घट

epfo
कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने  व्याज दरात घट केली आहे. ईपीएफओने 2016-17 साठी भविष्य निधी ठेवींवर 8.65 टक्के व्याज दर जाहीर केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (2015-16) भविष्य निधीवर ईपीएफओचे व्याज दर 8.8 टक्के होतं. यापूर्वी अर्थमंत्रालयाने 2015-16 या आर्थिक वर्षसाठी ईपीएफवरील व्याज दर कमी करुन 8.7 टक्के केलले हो
ते. मात्र, कामगार मंत्र्यांच्या नेतृत्त्वातील केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 8.8 टक्के व्याजाला मंजुरी दिली होती. ट्रेड युनियनच्या विरोधानंतर केंद्र सरकारने निर्णय मागे घेतला होता आणि शेअरहोल्डर्सना 8.8 टक्के व्याज देण्यास सहमती दर्शवली. देशात ईपीएफओच्या शेअरहोल्डर्सची संख्या 4 कोटींहून अधिक आहे.