बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (19:08 IST)

सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा भाव

सोन्या- चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे . घसरणीमुळे सोने 53 हजारांच्या खाली तर चांदी 70 हजारांच्या खाली आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे आणि रुपयाच्या मजबूतीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत आजची घसरण दिसून आली. रशिया युक्रेन संकटामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे . अलीकडेच वायदा बाजारात सोन्याने 19 महिन्यांसाठी 55190 रुपये प्रति 10 ग्रॅमची विक्रमी पातळी गाठली होती . मात्र तणाव कमी होण्याची चिन्हे दिसू लागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीतही घसरण  दिसून आली आहे.
 
आज सोन्याचा भाव 992 रुपयांनी घरसुन 52,635  रुपये प्रति 10 ग्राम झाला. चांदी चे भाव देखील घसरले आहे. चांदीचा भाव 1,949 रुपयांनी घसरून 69,458 रुपये प्रतिकिलो झाला.
 
 आधीच्या व्यवहारात चांदीचा भाव 71,407 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,983 डॉलर प्रति औंस होता, तर चांदीचा भाव 25.50 डॉलर प्रति औंस होता. युक्रेन संकटामुळे सोन्याचा भाव 55 हजारांच्या वर पोहोचला होता.