सोनारांचे व्यवहार केंद्र सरकार तपासणार
काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी संकेत दिल्यानंतर आता देशातील 600 ज्वेलर्सवर कारवाई होणार आहे. यामध्ये देशातील असलेल्या बड्या 25 शहरांतील सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी माहिती आयकर विभागने मागिवली आहे.तर त्यांचे जुने आणि नवीन व्यवहार तपासले जाणार असून जर गोंधळ दिसला तर ग्राहक आणि सोनारवर कारवाई होणार आहे. गुरुवारी आयकर विभागाने दिल्लीत चांदनी चौक, मुंबईत तीन ठिकाणी आणि चंदीगढ, लुधियाना यांच्याबरोबर अन्य शहरात अवैध पद्धतीने नोटा बदलने आणि हवालाचा व्यावसाय होत असल्याच्या शक्यतेने हे छापे मारले होते.