शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 10 जुलै 2017 (09:22 IST)

नकारात्मक जागतिक संकेतामुळे सोने आणि चांदीच्या दरात घट

डॉलर वधारत असल्यामुळे आज जागतीक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्यामुळे स्थानीक व्यापाऱ्यानी खरेदी टाळल्यामुळे  भारतीय बाजारातही सोने आणि चांदीचे दर कमी झाले. दिल्ली सराफात  स्टॅंडर्ड सोन्याचे दर 250 रुपयांनी कमी होऊन 28750 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. त्याचबरोबर शुद्ध सोन्याचे दर 250 रुपयांनी कमी होऊन 28900 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले.
 
सोन्याचे दर 220 रुपयांनी वाढले होते. जागतीक बाजारात तेजी नसल्यामुळे आणि औद्योगिक क्षेत्राकडून मागणी कमी झाल्यामुळे शनिवारी तयार चांदीच्या दरात 800 रुपयांची घट होऊन चांदीचा दर 37400 रुपये प्रति किलो झाला.