शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (11:49 IST)

सोन्या-चांदीच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण होत असताना दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा १५० रुपयांनी घसरले.  मंगळवारी सोन्याच्या दरात घट होत ते प्रतितोळा २९,८०० रुपयांवर पोहोचले.
 
स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात घट झाली. सोन्यासह मंगळवारी चांदीचे दरही कमी झाले. चांदीच्या दरात १०० रुपयांची घसरण होत ते प्रतिकिलो ३९,९००वर पोहोचले. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.