Gold Silver Rate Today: सोने-चांदी वधारले, खरेदी करण्यापूर्वी दर तपासा
गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक मानतात. देशातील सोने व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या पृष्ठावरील सोन्याच्या किमती प्रकाशित केल्या जातात.
सोन्याच्या किमतीतील वाढ हे देशातील गोल्ड ईटीएफच्या भूमिकेवरही अवलंबून असते. जेव्हा एखादी व्यक्ती गोल्ड ईटीएफ खरेदी करते तेव्हा त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढतात ज्यामुळे शेवटी चेन्नईतील सोन्याच्या किमतींवर परिणाम होतो.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.58 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर एक किलो चांदीचा दर 63,010 रूपयांवर व्यवहार करत आहे.
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. अशा प्रकारे आपण घरी बसल्या सोने-चांदीचे दर तपासू शकता.