शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (16:43 IST)

अमेझान, फ्लिपकार्टप्रमाणे आता सरकारी वेबसाइटवरून देखील करू शकाल शॉपिंग

आतापर्यंत तुम्ही फक्त अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि पेटीएम मॉल सारख्या ई-कॉमर्स साईटवरून ऑनलाईन खरेदी करत आहात, पण लवकरच तुम्ही सरकारी वेबसाइटहून शॉपिंग करू शकाल. यासाठी सरकार आपले पोर्टल गवर्मेंट इ-मार्केटप्लेस (GeM) चा विस्तार करणार आहे. रिपोर्टनुसार सरकारी कॉन्ट्रॅक्टर्स आणि प्रायवेट घाऊक खरेदीदारांना या पोर्टलचा वापर करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.  
 
2016 मध्ये झाली होती GeM ची सुरुवात  
सांगायचे म्हणजे की GeM ला वाणिज्य व उद्योग मंत्रालय मॅनेज करतो आणि या पोर्टलचा वापर सध्या सरकारी विभाग, मंत्रालय, सेना आणि राज्य सरकार चालवतात. GeM च्या एका अधिकार्‍याने सांगितले की वाणिज्य मंत्रालयाने या योजनेला पुढे वाढवण्यासाठी एक कॅबिनेट नोट देखील तयार केले आहे ज्याने पुढच्या वर्षाच्या सुरुवातीत सामान्य लोकांना या पोर्टलचा वापर करण्याची परवानगी मिळू शकते. सांगायचे म्हणजे GeM ला 2016 च्या ऑगस्ट महिन्यात लाँच करण्यात आले होते. GeM चे सीईओ पश्चिम बंगाल कॅडरचे आयएस तल्लीन कुमार याचे सीईओ आहे आणि त्यांची नियुक्ती नुकतीच झाली आहे.  
 
GeM वर कोण कोणत्या वस्तूंची विक्री होते    
आता प्रश्न असा आहे की जर या पोर्टलवर सामान्य लोकांना खरेदी करायचा मोका मिळेल तर ते काय काय खरेदी करू शकतील. तर तुम्हाला सांगायचे म्हणजे GeM पोर्टल वर स्टेशनरीपासून मोटार कारपर्यंत सर्व काही विकत घेऊ शकता. त्याशिवाय या पोर्टलवर सर्विसेजमध्ये ट्रांसपोर्टेशन, लॉजिस्टिक्स, वेस्ट मॅनेजमेंट, वेब कास्टिंग आणि   एनालिटिकल सारख्या सेवा सामील आहे.