शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (11:00 IST)

एअर इंडियातील 100 टक्के हिस्सा सरकार विकणार

प्रस्तावित निर्गुंतवणूक प्रक्रियेच्या अंतर्गत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सरकारी विमान कंपनी एअर इंडियातील आपला 100 टक्के हिस्सा विकणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली. एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीवर 50 हजार कोटींहून अधिक कर्ज आहे.
 
ही कंपनी गेली अनेक वर्षे तोट्यात सुरू आहे. तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्गुंतवणुकीचा (खासगीकरण) निर्णय घेतला आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले, 'नव्या सरकारच्या स्थापनेनंतर एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझमचे (एआयएसएएम) पुन्हा गठन करण्यात आले आणि एअर इंडियाच्या खासगीकरण्याच्या प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. एआयएसएएमने 100 टक्के भागीदारीच्या विक्रीला मंजुरी दिली आहे.'