आता जीएसटी १ जुलैपासून लागू होणार
जीएसटी (वस्तू व सेवाकर) आता १ एप्रिलऐवजी १ जुलै २०१७ पासून लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आता या परिषदेची बैठक १८ फेब्रुवारीला होणार असून त्यामध्ये जीएसटीसंबंधित अन्य ठरावांच्या मसुद्यांना मंजुरी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. याआधी ही प्रणाली १ एप्रिल २०१७ पासून लागू केली जाईल असा आशावाद अर्थमंत्र्यांनी केला होता.
जीएसटी लागू करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर अशी असून या प्रणालीनुसार केंद्र आणि राज्य सरकारांचे बहुतांश कर समाविष्ट केले जातील. केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवाकर, तसेच राज्यांचे व्हॅट आणि विक्रीकर आदींचा त्यात समावेश आहे.

