मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (16:14 IST)

ह्युंडईची भन्नाट ऑफर, नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका

hundai different offer
ह्युंडईने नव्या कारसाठी नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका अशी भन्नाट ऑफर कंपनीने आणली आहे.
 
ह्युंडई लवकरच त्यांची लोकप्रिय कार सॅन्ट्रो नव्या रुपामध्ये आणणार आहे. या कारसाठी नाव ग्राहकांनीच नाव सुचवावं असं अनोखं अभियान कंपनीकडून सुरू करण्यात आलं आहे. HyundaiNaamkaran.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्हीही यामध्ये सहभागी होऊ शकतात. संकेतस्थळावर गेल्यावर एएच2 सॅन्ट्रो (कोडनेम) या गाडीसाठी तुम्हाला जे नाव सुचवायचं असेल ते तुम्ही सुचवू शकतात. त्यानंतर सर्वाधिक मतं ज्या नावाला पडतील त्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल, आणि एका लकी विजेत्याला तिच कार मोफत दिली जाईल.
 
नाव सुचवण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर सुरू असून सॅन्ट्रो या नावालाच अधिकांश ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. दोन लाखांहून जास्त जणांनी सॅन्ट्रोलात आपली पसंती दर्शवली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर आय-5, तिसऱ्या क्रमांकावर स्प्लॅश आणि चौथ्या क्रमांकावर सानियॉन हे नाव आहे. कंपनीच्या या कारची 10 ऑक्टोबरपासून आगाऊ नोंदणी सुरू होणार असून 23 ऑक्टोबरला ही कार लॉन्च होणार आहे. या नव्या कारची किंमत साडेतीन ते साडेचार लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.