मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (17:05 IST)

युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम स्थानिक बाजारपेठेवर

cooking oil
युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होऊन खाद्यतेलाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. युक्रेनहून येणारी सूर्यफुल तेलाची आयात बंद झाल्यानंतर आता कंपन्यांकडूनही या तेलांची विक्री थांबविण्यात आली. 
 
या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत सूर्यफुल तेलाची कमतरता जाणवू शकते असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येतंय..162 रुपये किलो असलेलं सूर्य फुल तेल दहा रुपयांनी वाढलं आहे.
 
सध्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हापूस निर्यातीवर होणार आहे. 1 मार्चपासून एपीएमसीत मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होणार आहे. मात्र, या युद्धामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जवळपास 15 लाख पेट्या आखाती देशात पाठवल्या जातात.