रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (14:22 IST)

महागाईचा झटका ! चहा-कॉफी 14 टक्क्यांनी महागली

नेस्लेने आणि हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. वृत्तानुसार, कंपनीने ब्रू कॉफीच्या किमतीत 3-7 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किमतीत 3-4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रू इन्स्टंट कॉफी पाऊचची किंमत 3-6.6 टक्क्यांनी वाढली आहे. ताजमहाल चहाच्या किमतीत 3.7-5.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रूक बाँड 3 ची किंमत 1.5 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. भाववाढीबाबत कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, महागाईचा ताण वाढत आहे. असे असतानाही कंपनीने ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून दरात वाढ केली आहे.
 
नेस्ले इंडियाने A+ दुधाच्या कार्टनच्या किमतीत 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. पूर्वी त्याची किंमत 75 रुपये होती, जी आता 78 रुपये झाली आहे. तर, नेस्ले क्लासिक कॉफी पावडरच्या किंमतीत 3 ते 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, ज्यामध्ये 2.5 ग्रॅम पॅकची किंमत पूर्वी 78 रुपये होती, ती आता 80 रुपये करण्यात आली आहे. नेस्लेने क्लासिक कॉफीच्या 50-ग्राम पॅकच्या किंमतीत 3.4 टक्क्यांनी वाढ केली आहे, ज्याची किंमत पूर्वी 145 रुपये होती, आता ती 150 रुपयांना उपलब्ध होईल.