बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (15:43 IST)

आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी

करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 
 
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. 
 
विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही स्पष्ट केलं आहे.