शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आयटी कंपन्यासाठी जपानने दारे उघडली

भारतासह  अन्य देशीय आयटी कंपन्या व आय टी प्रोफेशनल्ससाठी जपानने त्यांच्या देशाची दारे खुली केली आहेत. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक वाढविण्याचा एक उपाय म्हणून जपानने त्याचे व्हिसा तसेच कायमच्या नागरिकत्वासाठीचे नियम शिथिल केले जात असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कार्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या दृष्टीनेही पावले टाकली आहेत.

जगातील अनेक देश व्हिसा नियम कडक करण्याच्या दृष्टीने हालचाली करत असतानाच जपानने हे नियम सोपे करत असल्याची घोषणा केल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. जपानतर्फे जगात सर्वाधिक गतीने मंजुर होईल असा नवा ग्रीन कार्ड प्रॉग्रॅम सुरू केला जात असल्याचे जाहीर केले गेले आहे. त्यात परदेशातील उच्च प्रोफेशनल्सना नागरिकत्व देण्याचे नियम सोपे करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यात हाय स्कील्ड परदेशी प्रोफेशनल्सना ग्रीन कार्ड व्हिसा अवधी पाच वर्षांवरून १ ते २ वर्षांवर आणला जाणार आहे. त्यानंतर हे लोक कायम नागरिकत्वासाठी अर्ज करू शकणार आहेत.

जपान तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला देश आहे मात्र येथील लोकसंख्या घटत चालली आहे. सध्या जपानमध्ये वर्कफोर्स संख्येत १ ते २ टक्के इतकाच परदेशी कर्मचार्‍यांचा हिस्सा आहे.