मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सध्या २०० रुपयांची नोट उपलब्ध नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्याने आणलेली २०० रुपयांची नोट एटीएमवर उपलब्ध होण्यासाठी आणखी तीन महिने लागणार आहेत. ही नोट एटीएममधून उपलब्ध करून देण्यासाठी या यंत्रांची मोठ्या प्रमाणावर फेररचना (रिकॅलिब्रेशन) करावी लागणार आहे. काही बँकांनी एटीएम कंपन्यांना या नव्या नोटेची चाचणी घेण्यास सांगितले असले तरी त्यांना २०० च्या नोटाच उपलब्ध झालेल्या नाहीत.
 
याबाबत एटीएम यंत्रांत २०० रुपयांच्या नोटेसाठी बदल करून घेण्यास रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला अजून आदेश आलेला नाही, असे एटीएम उत्पादक कंपन्यांनी म्हटले. बँकेकडून आम्हाला आदेश मिळाला की आम्ही यंत्रांत तसा बदल करून घेऊ, असे एजीएस ट्रॅन्झॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे अध्यक्ष आर. बी. गोयल यांनी सांगितले. एजीएसने देशभर ६० हजार एटीएम बसवले आहेत. ही नवी नोट आम्हाला मिळाली की त्यानुसार एटीएमच्या कॅसेटमध्ये बदल केले जातील. हा तांत्रिक बदल करून घेण्यासाठी ९० दिवस लागतील असे गोयल यांनी सांगितले आहे.