शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (12:15 IST)

LPG गॅस सिलिंडर 115 रुपयांनी स्वस्त, 4 महानगरांमध्ये काय आहे किंमत जाणून घ्या

gas
नवी दिल्ली. तेल कंपन्यांनी आजपासून देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 115 रुपयांनी कपात केली आहे. मात्र, यामुळे घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध असेल.
 
IOCL नुसार, दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 115.5 रुपयांनी कमी झाली आहे. कोलकात्यात 113 रुपये, मुंबईत 115.5 रुपये आणि चेन्नईमध्ये 116.5 रुपयांची कपात झाली आहे.
 
1 नोव्हेंबरपासून दिल्लीत 19 किलोचा इंडेनचा सिलेंडर 1744 रुपयांना मिळणार आहे. आतापर्यंत याची किंमत 1859.5 रुपये होती. अशा प्रकारे कोलकातामध्ये 1846 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होईल. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1696 रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 1068.5 रुपयांना मिळणार आहे.
 
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसची किंमत ठरवतात हे उल्लेखनीय. हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या दुकानात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो.