शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (13:36 IST)

महेंद्रसिंह धोनी JioMart चा ब्रँड अॅम्बेसेडर

Mahendra Singh Dhoni Brand Ambassador of JioMart : रिलायंस रिटेल (Reliance Retail) च्या जियोमार्ट (JioMart) ने भारतीय क्रिकेट ऑयकन महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. यासह JioMart ने आपल्या उत्सव मोहिमेचे नाव बदलून 'Jio Utsav, Celebration of India' असे केले आहे. 8 ऑक्टोबर 2023 पासून या उत्सवी मोहिमेची विक्री सुरू होईल.
 
क्रिकेट चाहत्यांमध्ये 'माही' या नावाने प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, भारताची जिवंत संस्कृती, लोक आणि सण यासाठी ओळखले जाते. JioMart ची 'जिओ उत्सव मोहीम' हे भारत आणि तेथील लोकांच्या उत्सवाचे प्रतीक आहे. JioMart शी निगडीत राहून आणि लाखो भारतीयांच्या खरेदी प्रवासाचा एक भाग होण्यासाठी मी अत्यंत उत्साहित आहे.
 
ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून धोनीचे स्वागत करताना, JioMart चे CEO संदीप वरगंटी म्हणाले की, एमएस धोनी हा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून एक उत्तम पर्याय आहे, त्याचे व्यक्तिमत्त्व JioMart प्रमाणेच विश्वासार्ह आहे. धोनीने देशाला साजरे करण्याचे अनेक प्रसंग दिले आहेत आणि आता ग्राहकांना JioMart वर सेलिब्रेशन करण्याची आणखी एक संधी मिळत आहे आणि 'खरेदी' हा या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे.
 
JioMart वर इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशन आणि ब्युटीपासून घराच्या सजावटीच्या वस्तूंपर्यंत लाखो उत्पादने उपलब्ध आहेत. JioMart प्लॅटफॉर्ममध्ये Urban Ladder, Reliance Trends, Reliance Jewels, Hamleys यासह रिलायन्सच्या मालकीच्या ब्रँडची उत्पादने समाविष्ट आहेत.
 
जिओमार्टच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 1,000 हून अधिक कारागिरांची सुमारे 1.5 लाख उत्पादने सध्या विकली जात आहेत. मोहिमेच्या शूटचा एक भाग म्हणून जिओमार्टचे सीईओ वरगंटी यांनी धोनीला बिहारच्या कारागीर अंबिका देवी यांनी बनवलेले मधुबनी पेंटिंग भेट दिले. धोनी 45 सेकंदांच्या चित्रपटात ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून दिसणार आहे.