मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 17 डिसेंबर 2023 (14:32 IST)

आता मिळणार 600 रुपयांत सिलिंडर!

LPG Gas Cylinder
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, गरीब कुटुंबांना स्वस्त दरात एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देत आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका येथे एलपीजीच्या किमती भारतापेक्षा खूप जास्त आहेत.  

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY)   केंद्र सरकार गरीब कुटुंबांना 300 रुपये अनुदान देते. अशा परिस्थितीत, योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्लीत 603 रुपयांना 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर मिळेल.
 
केंद्र सरकारच्या या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला ती नवी दिल्लीत 903 रुपयांना खरेदी करावी लागेल. नंतर, 300 रुपयांची सबसिडी थेट तुमच्या खात्यात येतील.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
 ‘Apply for PMUY कनेक्शन’ वर क्लिक करा.
. ज्या कंपनीचा गॅस सिलिंडर तुम्हाला घ्यायचा आहे ती कंपनी निवडा. 
आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती द्या. नंतर बटणावर क्लिक करा. 
योजनेला पात्र असल्यास या योजनेचा लाभ मिळू शकेल.  

Edited by - Priya Dixit