शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पेट्रोल, डिझेल स्वस्त

नोटबंदीमुळे वैतागलेल्या नागरिकांना पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करून मोठा दिलासा दिला आहे.
 
पेट्रोलचे दर प्रति लीटर 1 रुपया 46 पैशांनी, तर डिझेल प्रति लीटर 1 रुपया 53 पैशांनी स्वस्त झाले आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. आठवडाभरापूर्वीचा म्हणजे 5 नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांच्या आतच दर कमी झाले आहेत.
 
सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत जात होते. ऑक्टोबरमध्ये दोन वेळा, तर सप्टेंबरमध्येही 16 तारखेला पेट्रोल- डिझेलचे दर वाढले होते. कच्च्या तेलातील चढ- उताराच्या आधारावर घरगुती ऑइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल डिझेलच्या किमती स्वस्त- महाग करत असतात.