शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 10 जुलै 2021 (12:35 IST)

पेट्रोल आणि डिझेल महाग झाले,जाणून घ्या 4 महानगरांमध्ये काय किंमत आहे

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वेगाने वाढत आहेत.शनिवारी पुन्हा एकदा दोघांच्या किंमती वाढल्या. देशातील चार मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल 39 पैसे आणि डिझेल 32 पैशांनी महागले आहे.
 
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत 35 पैशांनी वाढून 100.81 रुपये आणि डिझेल 26 पैशांनी वाढून 89,88 रुपये प्रति लीटर नोंद झाली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्याचा क्रम 04 मे पासून सुरू झाला.त्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत 10.51 रुपयांची वाढ झाली आहे.तर डिझेलच्या दरातही 9.17 रुपयांची वाढ झाली आहे.
 
मुंबईत पेट्रोल 34 पैशांनी वाढून106.59 रुपये आणि डिझेल 28 पैशांनी वाढून 97.46 रुपये प्रति लिटर झाले. चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात 30 पैसे आणि डिझेलच्या दरात 24 पैशांची वाढ झाली आहे. तेथे एक लिटर पेट्रोल 101.67 रुपये आणि डिझेल 94.39 रुपयांना मिळत आहे.
 
कोलकातामध्ये पेट्रोल 39 पैशांनी वाढून101.01 रुपये आणि डिझेल 32 पैशांनी वाढून 92.97 रुपये प्रति लिटर झाले.पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे दररोज पुनरावलोकन केले जाते आणि त्या आधारे नवीन दर रोज सकाळी 6. वाजे पासून लागू केले जातात.