Festival Posters

नोटाबंदीची मला कोणतीही कल्पना नव्हती : राजन

शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (16:57 IST)

‘केंद्र सरकारच्या नोटाबंदीची मला कोणतीही कल्पना नव्हती. मी स्वत: अमेरिकेतून नोटा बदलून घेण्यासाठी भारतात आलो होतो,’ अशा शब्दांमध्ये माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांना नोटाबंदीची कोणतीही कल्पना नव्हती, हे पुन्हा स्पष्ट केले.

रघुराम राजन यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राजन सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना आपण काही भारतीय नोटा अमेरिकेत घेऊन गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. ‘मी अमेरिकेत असताना नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी मला भारतात यावे लागले होते,’ असे राजन म्हणाले.  आपण कधीही नोटाबंदीचे समर्थन केले नसल्याचे रघुराम राजन यांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केले. ‘नोटाबंदी तात्कालिक स्थितीत चांगली वाटत असली, तरीही तिचे दीर्घकालीन फायदे कमीच आहेत. किंबहुना नोटाबंदीमुळे भविष्यात फार काही सकारात्मक घडणार नाही,’ असे त्यांनी म्हटले. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीकडून २३ जुलै रोजी बंदची हाक

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसनिमित्त २२ ते २९ जुलै दरम्यान 'हरित महोत्सव' आयोजित करण्यात येणार

उद्धव ठाकरे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी २२ जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर दाखल होणार

दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीने २३ जुलै रोजी बंदची हाक दिली

पुढील लेख
Show comments