रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (13:06 IST)

फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर - शंकरअण्णा धोंडगे

सर्वत्र दुष्काळ, नापिकी, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी संकटात असून सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी गुरुवारी लोहा पत्रकार परिषदेत केले.
 

शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत येऊन कर्जाच्या मोठ्या विळख्यात सापडली आहेत. कर्जमाफीच्या कचाट्यातून शेतकरी वर्ग अजूनही सावरला नाही. त्यामुळे विनाअट शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी आज पर्यन्त झाली नाही. परिणामी फडणवीस सरकार असंवेदनशील असून सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन शंकरअण्णा यांनी किसान मंच शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत लोहा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 

पुढे बोलताना ते म्हणाले की विदर्भातील शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था असून छत्तीस कोटी रुपयाचे सोयाबीन अनुदान अजूनही सरकारने दिलेले नाही.

परिणामी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन सुलतानी संकटाचा सामना कारावा असे मत त्यांनी मांडले. यावेळी बाबासाहेब देशमुख, माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, संजय पाटील कराळे, छत्रु महाराज, शिवराज पवार, बंटी सावंत, जीवन वडजे आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.