शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रामेश्वर बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

दि महाराष्ट्र अर्बन कॉ-ऑप.बँक फेडरेशन तर्फे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांना दरवर्षी सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. बोरिवली येथील रामेश्वर कॉ-ऑप.बँकेने संपूर्ण महाराष्ट्रातून युनिट बँक गटामध्ये सवोत्कृष्ट बँकेचा तृतीय पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. रामेश्वर बँकेचे अध्यक्ष पंडित सावंत, उपाध्याक्ष सुनील नलावडे, संचालक दिलीप चव्हाण, चंद्रकांत चव्हाण सुमेधा सावंत, दीपाली चव्हाण, सी.ई.ओ विजय मोरे यांनी स्वीकारला. बँकेचे अध्यक्ष पंडित सावंत यांनी या पुरस्कारसाठी बँकेवर विश्वास दाखवणाऱ्या सर्व सभासद ठेवीदार यांना समर्पित केला असून बँकेच्या प्रगतीसाठी सर्व सभासद आणि हितचिंतकांचे आभार मानले. बँकेची अधिक प्रगती करण्याचा मानस व्यक्त केला आहे.