शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (16:46 IST)

RBI चे नवे आर्थिक धोरण जाहीर,

कोरोनाच्या प्रादुर्भावाला लक्षात घेऊन आरबीआय ने आपल्या व्याजदरात कोणतेही बदल केले नसून सध्याचा रेपोदर 4 टक्के असेल.तर रिव्हर्स रेपोदर 3.35 टक्केच राहणार.
आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केला नसून व्याजदर तशीच असण्याचे सांगितले असून.या वर्षीचा विकासदर 9.5 टक्के असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पूर्वी विकास दर 10.5 असल्याचा अंदाजही व्यक्त केला होता. आरबीआय ने सलग हे सहाव्यांदा आपल्या व्याजदरात बदल न केल्याचे झाले आहे. 
 
कोरोनाच्या प्रादुर्भावाला लक्षात घेऊन आरबीआय ने आपल्या रेपो दर,रिव्हर्स दरांमध्ये कोणतीही बदल न केल्याचे समजत आहे. त्यामुळे रेपोदर 4 टक्के तर रिव्हर्स दर 3.35 टक्केच राहणार.मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा 4.25 टक्के आणि बॅंक दर हा 4.25 टक्के असेल. 
 
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना सांगितलं की, चालू आर्थिक वर्षात विकास दर हा 9.5 टक्के असू शकतो.या पूर्वी तो 10.5 टक्के राहण्याची शक्यता आहे.या वर्षात महागाई दर15.1 टक्के असू शकतो.
। 
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक समाप्त झाली आहे. त्यानंतर आरबीआयनं आपले आर्थिक धोरण जाहीर केलं आहे. कोरोनाचा मोठा आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असून त्यामुळे गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच जीडीपीने निच्चांक गाठला असून त्यात  2020-21 या वर्षासाठी 7.3 ने घसरण झाली. 
कोरोनाच्या पार्श्ववभूमीला बघता आरबीआय ने हे निर्णय घेतले आहे.महागाई कमी होत असलेला दर आणि मान्सून चांगले येण्याची शक्यता व्यक्त करत देशाची आर्थिक स्थिती रुळावर येण्याची शक्यता आरबीआयने वर्तविली आहे.