बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 31 डिसेंबर 2019 (14:53 IST)

रिलायन्स जिओची जबरदस्त,ऑफर 1024 जीबी डेटा देणार

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी नेहमीच वेग वेगळे ऑफर देत असते. या शृंखलेत यंदा कंपनीनं पुन्हा 199 रुपयांचे टॉपअप व्हाऊचर्स आणले आहे. ज्याचा लाभ जिओ धारकांना मिळणार. ह्या योजनेत फायबर्स धारकांना 1 जीबी (1024 जीबी डेटा) देणार. त्याची मर्यादा 7 दिवस अशी असणार .या आधी ह्या व्हाउचर्स मध्ये 100 जीबी डेटा देण्यात येत होता. ह्या व्हाऊचर्स चा फायदा 699 आणि 849 चे यूजर्स पण घेऊ शकतात. या ऑफर मुळे डेटा संपण्याची काळजी धारकांना करावयाची नाही. जिओचे दोन्ही फायबर प्लॅन एफयू पी मर्यादेसह उपलब्ध आहे.
 
जिओ फायबरचे 199 रुपयांचे टॉप-अप व्हाऊचर
 
कंपनीने जिओ फायबर धारकांना जास्त डेटा देण्यासाठी 199 रुपये किमतीचे टॉप-अप व्हाऊचर सादर केले आहे. आता धारकांना त्यात 1 जीबी (1,024 जीबी डेटा) आणि सात दिवसांची वैधता मिळू शकेल. यापूर्वी, फायबर धारकांना ह्या पॅक मध्ये 100 जीबी डेटा मिळायचा.  
 
199 रुपयांच्या ऑफरबद्दल यूजर्स संभ्रमात 
 
कंपनीनुसार आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो की जिओ ची 199 रुपयांची ऑफर फायबर प्लॅन नसून फक्त टॉप-अप व्हाऊचर आहे. आणि ते  मंथली रिचार्ज केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, धारक  699 रुपयांचा प्लॅन वापरत असल्यास सोबत त्याला 150 जीबीचा डेटा मिळतो. जर का युजर्सला हा डेटा कमी पडत आहे असे वाटत असेल तर त्याने पुन्हा व्हाऊचर रिचार्ज केल्यास त्याला अतिरिक्त 150 जीबी डेटा मिळेल. पण ही ऑफर फक्त 7 दिवसांसाठीच वैध असेल.
 
एअरटेलसाठी एक कठीण आव्हान 
 
टेलिकॉम मार्केटमध्ये जिओच्या ब्रॉडबँड योजनेमुळे एअरटेलला कडक स्पर्धा झाली आहे. ह्या पूर्वी एअरटेल ने काही काळापूर्वी हैदराबादमध्ये 799 रुपयांची योजना सुरू केली होती, ज्यामध्ये धारकांना अमर्यादित कॉलची सुविधा दिली होती.आता जिओने एअरटेलला आव्हाहन देण्यासाठी 699 रुपयांची योजना सुरू केली आहे. ह्यात यूजर्ससाठी एफओपी मर्यादेसह 150 जीबी डेटा देण्यात येत आहे.
 
हैदराबादच्या धारकांसाठी एअरटेलने अतिरिक्त डेटा देण्यासाठी 299 रुपयांच्या पॅकचा पुनर्विचार केला असून त्यात 3.3 जीबीचा डेटा देण्यात आला. त्याचे प्रत्युत्तर म्हणून जिओने 199 रुपयाच्या व्हाऊचर ला अद्यतनित(अपडेट) केले आहे.