बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एसबीआयच्या ऑडीटर लॅपटॉप चोरीला

इंदौर येथून नाशिकमध्ये आलेल्या एसबीआयच्या ऑडीटर अर्थात हिशोब तपासणीसचा लॅपटॉप चोरीला गेला आहे. नाशिक इंदौर प्रवासादरम्यान तो चोरीला गेला आहे. याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील एसबीआयच्या शाखांचे हिशोब तपासण्यासाठी  संजय दिक्षीत (५८) हे सातपूर येथील ओद्योगिक एसबीआय शाखेच्या कामकाज तपासणीसाठी आले होते. त्याकरीता ते खाजगी बसने इंदोरहून नाशिकला आले. द्वारका येथे उतरत असताना  लॅपटॉप नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

हा काय प्रकार आहे आणि नेमके कोणता डाटा गेला ते पोलीस आणि सायबर क्राईम तपासात आहे. त्यामुळे मोठे खुलासे होणार आहेत.