एसबीआयकडून सर्व ई वॉलेट्स ब्लॉक
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व ई वॉलेट्स ब्लॉक केले आहेत. स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे एसबीआयच्या नेट बँकींगमधून पेटीएम, मोबी क्विक एअरटेल मनीसह अन्य ई वॉलेट्समध्ये पैसे पाठवता येणार नाहीत. मात्र क्रेडिट कार्डमधून या ई वॉलेट्समध्ये पैसे जमा करता येतील. ई वॉलेट्स ब्लॉक करण्याच्या निर्णयाबाबत रिझर्व्ह बँकेने खुलासा मागवला असता संरक्षण आणि व्यावसायिक हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एसबीआयने सांगितले.