शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2017 (11:53 IST)

नोटा बदलण्यासाठी सर्व्हिस चार्ज

एसबीआयने पुन्हा एकदा सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत जून्या आणि फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त सर्व्हिस चार्ज आकारला जाणार आहे. तसंच बचत खात्यातून पैसे काढणाऱ्या ग्राहकांनाही सर्व्हिस चार्जचा भुर्दंड पडणार आहे. नवे नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत. नोटा बदलण्यासाठी 2 ते 5 रुपयांचा सर्व्हिस चार्ज आकारला जाईल. यात 20 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या नोटा किंवा 5 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेतल्यास  सर्व्हिस चार्ज आकारला जाईल.