सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2017 (16:40 IST)

एसबीआय : बचत खात्यांवरील व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केले

स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यांवरचं व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केलं आहे. १ कोटी रूपयांपर्यंतची रक्कम ज्या बचत खात्यांवर जमा आहे त्या सगळ्या खात्यांचं व्याजात ०.५ टक्क्यांची कपात होणार आहे. बचत खात्यांवर असलेल्या १ कोटींपेक्षा जास्त रकमेसाठी ४ टक्के व्याजदर आहे त्यात काहीही बदल होणार नाहीये. मात्र १ कोटी रूपयांच्या आतल्या रकमेवर आता ३.५ टक्के व्याज मिळणार आहे. याबाबतची माहिती एसबीआयनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सोमवारी दिली आहे. सध्याच्या घडीला एसबीआयच्या ९० टक्के खात्यांमध्ये १ कोटी किंवा त्याच्या आतल्याच रकमा आहेत.