शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2017 (20:52 IST)

दिलासा : केंद्र सरकारकडून आणखी 1 लाख टन तूर खरेदीला परवानगी

door dal

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना  दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राने 2 लाख टन खरेदीसाठी परवानगी मागितली असतानाच केंद्रानं 1 लाख टन तूर खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर मुद्द्यावर  केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर हा दिलासादायक निर्णय केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिला आहे.