भाजीपाला महागला : भाजीपाल्याचे दर वधारले
भाजीपाल्याचे दर महागल्याने सर्वसामान्य माणसाचे बजेट कोलमडून गेले आहे. अवकाळी पाऊस आणि इंधन दरवाढ या मागील कारण सांगण्यात येत आहे .मिरची, वांगी , गवार, भेंडी , फ्लॉवर या भाज्यांचे दर वधारले आहे . या मुळे सर्व सामान्य माणसाचे बजेट बिघडणार आहे. शेतकरी बांधवाना देखील यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे . त्यात इंधन दर वाढ केल्यामुळे त्यांना देखील महागाईचा फटका बसला आहे . त्यामुळे त्यांच्या भाजीला व्यापारी वर्ग कमी दरात घेतो .समस्त व्यापारी वर्ग आणि सामान्य ग्राहक इंधन दर कमी करण्याची मागणी करत आहे .