शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (20:37 IST)

Wildcraft विदेशी कंपन्याना मागे टाकणार, लष्कराने दिली मोठी ऑर्डर

साहसी खेळाशी संबंधित सामान आणि बॅग बनवणारी भारतीय कंपनी Wildcraft ला भारतीय लष्कराकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही कंपनी आता नायकी, अदिदास, रीबॉक, पुमा सारख्या कंपन्यांना मागे टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. 
 
भारतीय लष्कराकडून मिळालेली ही ऑर्डर सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मागील वर्ष संपण्याआधीच भारतीय लष्कराने कंपनीशी करार केल्याचं सांगतात. भारतीय लष्करासाठी बँगांबरोबरच कंपनीने कोरोनाचे संकट लक्षात घेता खासगी सुरक्षेसंदर्भातील वस्तूंच्या निर्मितीची सुरूवात देखील कंपनीने केली आहे. मास्क, पीपीई किट सारख्या गोष्टींची निर्मिती देखील कंपनीने केली आहे. 
 
या ऑर्डरनुसार कंपनी लष्करासाठी दोन लाख रकसॅकची निर्मिती करणार आहे. ९० लीटरच्या या रकसॅकची डिझाइन आणि इतर गोष्टींना संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या बँगांच्या चाचण्याही झाल्या असून संरक्षण मंत्रालयाने कंपनीला निर्मितीला सुरुवात करण्यास सांगितले आहे. कंपनीचे सध्या कर्नाटकमधील बेंगळूरु आणि हिमाचल प्रदेशमधील सोनालमध्ये दोन मोठे कारखाने आहेत. लवकरच कंपनी देशातील ११ शहरांमध्ये ६५ नवे निर्मिती युनिट्स उभारणार असून एक लाख लोकांना रोजगार देणार असल्याचे समजते.