किराणा दुकानात वाईन मिळेल ! ठाकरे सरकार करू शकते मोठी घोषणा
आता महाराष्ट्रातल्या किराणा दुकानात वाईनच्या बाटल्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण आगामी काळात राज्य सरकार या दुकानांना वाइन विक्रीस परवानगी देऊ शकते. ठाकरे सरकार यासंदर्भात अधिसूचना काढण्याच्या तयारीत आहे. वाइनमध्ये बहुतेक अल्कोहोलपेक्षा कमी अल्कोहोल असते. त्यामुळे सरकार हा निर्णय घेऊ शकते.
राज्यातील वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत मोठ निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्यातील सुपर मार्केट, किराणा दुकान, बेकरी, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वाईन विकता येऊ शकते. मात्र, या वाईनच्या खरेदीवर प्रति लिटर 10 रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. किती वाईन विकली याचाही रेकॉर्ड सरकारला मिळणार आहे. राज्यात दरवर्षी 70 लाख दारूच्या बाटल्यांची विक्री होते, मात्र सरकारच्या धोरणानुसार दरवर्षी एक कोटी बाटल्या दारूची विक्री होणे अपेक्षित आहे.