1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (14:56 IST)

येवला मर्चंट बँक निवडणूक प्रचाराला सुरुवात; १३ नोव्हेंबरला मतदान

येवल्याच्या अर्थकारणात आणि राजकारणात महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या येवला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून १३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यासाठी समृद्धी पॅनलने प्रचारात आघाडी घेत गणपती मंदिर या ठिकाणी गणपती मंदिर या ठिकाणी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
 
याप्रसंगी येवला मर्चंट बँकेला अद्यावत व समृद्ध करण्यासाठी समृद्धी पॅनलची स्थापना केली असून पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष सुरज पटणी यांनी केले आहे. तसेच बँकेचे जेष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी आणि उद्योगपती मनीष काबरा यांनी देखील प्रचाराचा नारळ वाढवून बँकेच्या सभासदांना मतदानाचे आवाहन केले आहे.
 
याप्रसंगी माजी उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी, बालू शेठ परदेशी महेश भांडगे,शरद लहरे सीए सोमानी चंद्रकांत कासार ,सुहास भांबरे, शैलेश देसाई, डॉक्टर महेश्वर तगारे, अल्केश कासलीवाल, निरंजन परदेशी, मनोज दिवटे,सुभाष गांगुर्ड, प्रज्वल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
Edited by: Ratnadeep Ranshoor