1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

अमेरिकेत वाढतेय बेकारी

अमेरिकेत वाढतेय बेकारी
आर्थिक मंदीच्या विळख्यातून अजूनही अमेरिकेची सुटका होवू शकलेली नाही. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील 254000 जणांना आपली नोकरी गमवावी लागल्याने अमेरिकेत बेरोजगारी वाढतच चालली आहे.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात 277000 जणांना नारळ मिळाले होते. या तुलनेत सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेली कपात कमीच असली तरी अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने देशात अस्थिर वातावरण वाढले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शुक्रवारी अमेरिकी मनुष्यबळ मंत्रालय बेरोजगारी संबंधातील आकडेवारी जाहीर करणार असून, यात देशातील स्थितीची माहिती उघड होणार असल्याचे बोलले जात आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा