Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 29 डिसेंबर 2009 (10:53 IST)
एलजीच्या व्यवस्थापनात बदल
कोरियन कंपनी एल जी इलेक्ट्रॉनिक्सने भारतातील आपल्या व्यवस्थापनात बदल केले आहेत. कंपनीने वाय व्ही वर्मा यांना भारतातील मुख्य व्यवस्थापन अधिकारी म्हणून नियुक्त केले असून, त्यांच्यावर कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीची आणि वितरणाची जबाबदारी असणार आहे.
कंपनीचे वितरण संचालक व्ही रामचंद्रन यांच्यावर व्यवस्थापन नियोजनाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. अमिताभ तिवारी यांना विक्री विभागाचे प्रमुखपद देण्यात आले आहे.