1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

कंपन्यांची भरती सुरू होणार

कंपन्यांची भरती सुरू होणार
मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कपात करणाऱ्या कंपन्यांकडे आता पुन्हा एकदा कामं येत असल्याने या कंपन्यांनी भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक कंपन्या भरतीची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत.

पीएचडी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजने नुकतेच देशातील 186 कंपन्यांचे सर्वेक्षण केले. मागील सहा महिन्यांच्या तुलनेत कंपन्यांकडील काम वाढले असून, मंदीतून वर आल्यानंतर आता कंपन्यांना पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची गरज भासत असल्याचे यात म्हटले आहे.

पीएचडीचे अध्यक्ष सतीश बागरोडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक मंदी दूर झाल्याने अमेरिका आणि युरोपातून पुन्हा एकदा ऑर्डर्स मिळण्यास सुरुवात झाल्याने कंपन्यांनी भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे.