खाजगी उद्योगांना DRDO ची ऑफर
देशाच्या संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक शस्त्रांची मोठी मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील शस्त्रास्त्र तयार करणाऱ्या खाजगी कंपन्यांनी अत्याधुनिक शस्त्रं तयार करावीत. डिआरडिओ त्यांना आवश्यकती मदत करण्यास तयार असल्याची ऑफर डिआरडिओने देशातील कंपन्यांना दिली आहे.
डिआरडिओचे मुख्य नियंत्रक डॉ प्रल्हाद यांनी आयटी इन डिफेंस या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय संमेलनात ही ऑफर देशातील कंपन्यांना दिली आहे.
खाजगी उद्योगांनाही शस्त्रांचा विकास, त्याचे डिझाइन, परीक्षणात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 2010 पर्यंत या संबंधीची रूपरेखा आखण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.