1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

चीन व्याज दर वाढवणार

चीन पुढील वर्षातील दुसऱ्या तिमाहीपर्यंत आपल्या व्याज दरात वाढ करणार आहे. मंदी ओसरल्यानंतर चीनमधील बँकांनी प्रथमच व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मे किंवा जून महिन्यात देशातील महागाई वाढण्याची शक्यता असून, अन्न-धान्य महागाई दर नियंत्रणात असेल असे मत चीन मधील प्रसिद्ध अर्थ तज्ज्ञ बुत बा शुसोंग यांनी व्यक्त केले आहे.

येणाऱ्या वर्षात चीन मधील अर्थव्यवस्था सुधारणार असून, महागाई वाढण्याची भीती असली तरी सरकार यावर नियंत्रण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.