जपान मंदीच्या काठावर
येनमध्ये निर्माण झालेली तेजी जपानी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरत असून, मंदीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात किनाऱ्यापर्यंत आलेल्या जपानी अर्थव्यवस्थेला काठावरून पुन्हा मंदीच्या प्रवाहात परतावे लागण्याची भीती जपानी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
हिरोहिसा फुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून येनमध्ये तेजी असल्याने डॉलरच्या तुलनेत येनने 85 चा आकडा गाठला आहे.
येनमधील तेजी रोखण्यासाठी गरज भासल्यास अमेरिका आणि युरोपातील वित्त अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.