जपानमध्ये नॅनोचे ''जय हो''
WD
WDफुकुओका शहरात आयोजित मोटर शो दरम्यान जपानमधील अनेक प्रांतातून आणि राज्यातून कार प्रेमींनी इतकी गर्दी केली की, या शोमध्ये पहिल्यांदाच गर्दीने उच्चांक गाठला आहे.
जपानमधील सर्वात स्वस्त कारची किंमत सहा लाख रुपये आहे. नॅनो केवळ 2 लाखात मिळत असल्याने या कारला पाहण्यासाठी अनेक जण आवर्जून या शोला भेट देत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
जागतिक बँकेचे अध्यक्ष रॉबर्ट जोएलिक यांनीही भारत भेट दरम्यान नॅनोचे तोंडभरून कौतुक केले होते.
